ब्लॉग फॉलो करा व नवीन लेख वा व्हिडिओची माहिती ई मेल वर मिळवा.

Friday 9 March 2018

पोर्ट्रेट/ व्यक्तीचित्रण

जेव्हा एखाद्या व्यक्तीचा फोटो आपण काढणार असतो तेव्हा त्या फोटोतून ती "व्यक्ती" प्रतित व्हायला हवी. आता तुम्ही म्हणाल यात काय म्हणायचय? ज्याचा फोटो काढलाय तोच दिसणार की फोटोत  ;)
पण तसंं नाही, ती व्यक्ती कशी आहे, तिचे वेगळेपण, तिचाा स्वभाव, तिचे वागणे म्हणजेच एकूम त्या व्यक्तीचे व्यक्तित्व ( व्यक्तिमत्व) दाखवता आले पाहिजे.
शिवाय बाकीचे टेक्निक आहेच. बघु काय काय करता येईल
१. पहिला महत्वाचा मुद्दा अॅज युज्वल लाईट/ उजेड. व्यक्तीच्या चेहऱ्यावर उजेड पडलेला हवा. पण हा उजेड भगभगीत नको तर सॉफ्ट हवा. म्हणजे एकदम उन्हातला फोटो नको पण चेहरा प्रकाशित हवा.

२. बॅकग्राऊंड शक्यतो प्लेन हवी, किमान इंप्रेसिव्ह नको. फोटोमधे चेहरा महत्वाचा हवा. आजुबाजूकडे लक्ष जाता कामा नये. पाहणाऱ्याचा फोकस चेहऱ्यावरच राहिल असे हवे. 
उदाहरणार्थ या फोटोत मागच्या फ्लेक्सवरचा चेहराही लक्ष वेधून घेतोय. 
 पण या फोटोत मात्र मागची व्यक्ती ब्लर झाल्यामुळे मूळ व्यक्तीवरच फोकस रहातोय.

३. एकदम समोरून सरळ फोटो काढला तर तो फ्लॅट दिसू शकतो. त्यामुळे शक्य तो चेहरा थोडा, किमान 10% तिरका असू दे. त्यामुळे चेहऱ्याची त्रिमिती पकडता येते. 
हा फोटो एकदम समोरून आहे, त्यामुळे बाळाच्या चेहऱ्यातला गोलवा, गोबरेपणा पकडता आलेला नाही. 

यात मात्र बाळाचे गोबरे गाल, अपरं नाक, डोळ्यांचा फुगीरपणा नेमका पकडला गेला आहे. पटकन गालगुच्चा घ्यावा वाटतोय. शिवाय ओठातला बुडबुडाही त्रिमितीची मजा आणतोय.


४. कोणत्या लेव्हलवरून तुम्ही फोटो काढताय हेही महत्वाचे ठरते. तुम्ही ज्याचा फोटो काढताय ती व्यक्ती तुम्हाला कशी दाखवायची आहे हे अँगलमधून प्रतित होते. 
तुम्ही अन व्यक्ती एका लेव्हलला आहात हे दाखवायचे असेल तर आय लेव्हल अँगल हवा. व्यक्ती लार्जर दॅन लाईफ / खुप मोठी/ आदरणीय दाखवायची असेल तर तुम्ही आय लेव्हलच्या खाली कॅमेरा ठेवा. जर व्यक्तीचे लहानपण/ छोटेपण/खुजेपण दाखवायचे असेल  तुम्ही कॅमेरा वरतून लावा. जर तुम्हाला दाखवायचय ते आणि हा अँगल गडबड झाली तर वेगळा मेसेज जाऊ शकतो. 

५. व्यक्तीचित्रण करताना फोकस डोळ्यांवर हवा. नाकावर नको. नाक पुढे असल्याने, मध्यात असल्याने फोकस चुकू शकतो.

६. जर विशिष्ट पोज घेऊन फोटो काढणार असाल तर त्या व्यक्तीचे हाय पॉईंट्स लक्षात घ्या. कोणत्या बाजुने चेहरा जास्त चांगला दिसतो ते ठरवा अन त्यानुरुप रचना करा.
जर नॅचरल फोटो काढणार असाल तर व्यक्तीला आधी गप्पा मारून मोकळे करा. कॉंशसनेस घालवा. असे फोटो जास्त छान येतात. 
अनोळखी व्यक्ती असेल तर तिला आधी थोडे जाणून घ्या. 

७. रुल ऑफ थर्ड ( गोल्डन पॉईंट वगैरे), डेफ्थ ऑफ फिल्ड, स्पेस टू व्हिजन हेही लक्षात असू दे. 

८. सर्वात महत्वाचे, आधी ती व्यक्ती जाणून घ्या. किंवा ज्या कारणासाठी फोटो काढताय ते नीट मनात नक्की करा. म्हणजे फोटोमधे ती व्यक्ती, त्या व्यक्तीचे ते विशिष्ट  भाव येत आहेत का हे तुम्ही तपासू शकाल. 




No comments:

Post a Comment

कमेंट खाली कृपया आपले नाव लिहा.
शक्य तर मला आपले फोटो पाठवा (इमेल/ व्हॉट्स अप ) तुमचे फोटो आणि त्यावरच्या माझ्या कमेंटस मी पोस्ट मध्ये अॅड करेन